Breaking

बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५

*अनेकांत स्कूलच्या प्राचार्या मा.प्रिया गारोळे बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रिन्सिपल पुरस्काराने सन्मानित*



प्राचार्य प्रिया गारोळे यांचा सत्कार करताना सचिव डॉ. महावीर अक्कोळे,प्रा. आप्पासो भगाटे, संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे,मॅनेजर अभिजीत अडदंडे, प्रा. बी.ए.पाटील व कल्याणी अक्कोळे 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या सौ. प्रिया गारोळे यांना सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन कडून बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रिन्सिपल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रशंसा प्रमाणपत्र आणि रोख रुपये असे या सन्मानाचे स्वरूप आहे. सलग आठव्या वर्षी सुद्धा ऑलिम्पियाड परीक्षांमध्ये शाळेने उत्तम यशाची परंपरा राखत अनेकांतच्या नावात यशाचा आणखी एक शिरपेच रोवला आहे.

     मागील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इंग्लिश विषयातील ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये शाळेतील एकूण ९९ विद्यार्थ्यांना विविध स्तरांवर मेडल मिळालेले असून यामध्ये ६० विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल टॉप रँक तर २७ विद्यार्थ्यांना झोनल रँकचे मेडल मिळाले आहेत. मॅथ्स ऑलिम्पियाड मध्ये शाळेतील एकूण २२४ विद्यार्थ्यांना विविध स्तरांवर मेडल मिळालेले असून १२३ विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल टॉप रँक तर ९८ विद्यार्थ्यांना झोनल रँकचे मेडल मिळाले आहेत. सायन्स ऑलिम्पियाड मध्ये एकूण १४४ विद्यार्थ्यांना मेडल मिळालेले असून १०४ विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल टॉप रँक तर ४२ विद्यार्थ्यांना झोनल रँकचे मेडल मिळालेले आहेत. 

    अनेकांत स्कूल मधील शैक्षणिक गुणवत्ता कायम राखत शाळेतील विद्यार्थी विविध आघाड्यांवर यश मिळवत असतात. प्राचार्या सौ. प्रिया गारोळे यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे , संस्थाचालक प्रा. अप्पासाहेब भगाटे, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर वरील प्रा. बी.ए पाटील, शाळेचे मॅनेजर अभिजीत अडदंडे, शैक्षणिक समन्वयक कल्याणी अक्कोळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन व सत्कार करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा